हडपसर (प्रतिनिधी) एस. एम. जोशी कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरण समिती, स्टाफ वेल्फेअर , राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुर्वेद तज्ञ डॉ. लीना बोरुडे म्हणाल्या की, महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक आरोग्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे .आहार-विहार याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवे. आनंदी जीवन जगले पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. निशा पानसरे पानसरे म्हणाल्या की, महिलांनी काळाबरोबर बदल स्वीकारला पाहिजे .मेंनस्ट्रोल सायकल बद्दल माहिती दिली मेंनस्ट्रोल कपचे महत्व विशद केले.मिनू भोसले म्हणाल्या की, भूतकाळातील वाईट गोष्टींचे विस्मरण झाले पाहिजे. चांगल्या गोष्टींचे स्मरण ठेवून आशावादी जीवन जगण्यासाठी महिलांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच डॉ. मेघा शर्मा यांनी मेंनस्ट्रोल कप चे डेमोनस्ट्रेशन व PPT presentation केलें.मा. उषाधुमाळ, मा. मनीषा राऊत यांनी मेंनस्ट्रोल कपचे महिलांना वितरण केले तसेच मोलाचे मार्गदर्शन केले .डॉ.हेमलता कारकर यांनी सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील ,लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी त्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लोक कल्याणासाठी त्यांनी काम केले त्यांचे ऋण त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. महिलांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असले पाहिजे .स्त्री जर सुदृढ असेल तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल बनेल असे विचार त्यांनी मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सरोज पांढरबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. ज्योती किरवे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा शितोळे यांनी केले .प्रा. संगीता यादव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जागतिक महीला दिन महाविद्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन
March 8, 20220
Related Articles
September 19, 20230
“आमच्याशी पंगा घ्याल, तर एकेकाचा मुडदा पाडू असे म्हणत धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवित खून, आरोपींना २ तासात अटक – हडपसर तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी”
प्रतिनिधी-स्वप्नील कदम
आमच्याशी पंगा घ्याल, तर एकेकाचा मुडदा पाडू असे म्ह
Read More
January 10, 20250
सन २०२५ चे डॉ. सि. तु. (दादा) गुजर पुरस्कार जाहीर
थोर समाजसेवक डॉ. सि. तु. तथा दादा गुजर यांच्या नावाने सामाजिक क्षेत्र व वैद्य
Read More
March 16, 20240
कै.विठ्ठलराव शिवरकर यांचा 39 वा स्मृतीदिन संपन्न
हडपसर, पुणे : माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलराव शिवरकर यांच्या 39 व्या स्मृतिदिन
Read More