हवेली प्रतिनिधी – अमन शेख
“बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा उपहार आहे. निसर्गाने हा उपहार केवळ स्त्रीला बहाल केलेला असून गरोदरपणातील ‘ती’ चा हा प्रवास सर्वोत्तम असतो. या काळात बाळाच्या जन्माबरोबरच संपूर्ण ९ महिन्याच्या प्रवासादरम्यान स्त्री ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”असे विचार प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले.
महिला दिनानिमित्त लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल ने आई आणि बाळासाठी “माहेर” हा सर्वसमावेशक उपचार विभाग सुरू केला. त्याचे उद्घाटन स्पृहा जोशी आणि विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड यांनी केले. या वेळी स्पृहा जोशी यांनी आपले विचार मांडले.
स्पृहा जोशी म्हणाल्या,“विश्वराज हॉस्पिटलने महिलांना गरोदरपणात आणि नंतर मौल्यवान आरोग्य सुविधा देऊन अतिशय अद्भूत पाऊल उचलेले आहे. अशा सुविधांमुळे महिलांचे आणि बाळांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.”
डॉ. आदिती कराड म्हणाल्या,“ माता आणि बाळाचे आरोग्य हा देशातील सर्वात गंभीर विषय असल्याने त्याला प्राधान्य दिले पाहिजे. नव्याने सुरू केलेला हा विभाग जागतिक मानकांनुसार आहे. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवी कल्पना आणि कुशल डॉक्टरांच्या टीम द्वारे सर्वोत्तम उपचार सेवा पुरविली जाईल. रुग्ण केंद्रित या हॉस्पिटलमध्ये नैतिकतेबरोबरच समाजाच्या आरोग्य संबंधीच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील.”
माहेर या विशेष विभागामध्ये सर्व अत्याधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध आहे, लेवल थ्री नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एन आय सी यु ), अत्याधुनिक बालरोग अतिदक्षता विभाग ( पी आय सी यु), अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह याच बरोबर गरोदर स्त्रियांसाठी प्रसूतीपूर्व उपक्रम ज्यामध्ये भौतिक चिकित्सा व योगा सत्रे, आहार समुपदेशन, स्तनपान समुपदेशन आणि नवजात शिशु ची काळजी घेण्याचे सल्ले या सर्व सुविधा देखील उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा सर्वसमावेशक उपक्रम हा गरोदर स्त्री ला प्रसूतीसाठी तयारी करताना तिच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. असे डॉ. अदिती कराड म्हणाल्या.
विश्वराज हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विक्रम अग्रवाल म्हणाले,“नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामधील कमतरतेमुळे अर्भकांचे जीव गमवावे लागतात. त्यामुळे आजच्या काळात नवजात शिशू अतिदक्षता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग आणि स्त्री रोग शास्त्र व प्रसूतिशास्त्र यांमधील गुंतागुंतीच्या समस्यांसाठी उपचार सेवा यांच्या एकत्रिकरणाची गरज आहे. त्यामुळे बालकांचा मृत्यू दर कमी होईल.”
यावेळी स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एन. शिंदे, समुपदेशक डॉ. योगिनी पाटील, डॉ. मानसी गायकवाड, डॉ. सुषमा कुंजीर, लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तज्ञ आणि गुंतागुंतीची प्रसूती तज्ञ डॉ. अमित शहा, बालरोग तज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ डॉ. चंद्रकांत सहारे, समुपदेशक डॉ. महेश शिंदे, भूलतज्ञ, आहार तज्ञ, स्तनपान समुपदेशन तज्ञ आणि भौतिक चिकित्सा तज्ञ उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रामधील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलासांठी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत मॅमोग्राफी स्क्रीनिंग यांचे आयोजन केले होते.
डॉ. योगिनी पाटील यांनी प्रास्ताविक केले.
मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.पी.के. देशमुख यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे
बॉक्सः
विश्वराज हॉस्पिटलमध्ये आई आणि बाळासाठी ‘ माहेर’ हा सर्वसमावेशक उपचार विभाग सुरू केला गेला. आरोग्याच्या सर्वोत्तम उपचार सेवा पुरवण्यासाठी हे वचनबद्ध आहे. महिला या समाजाच्या मुख्य योगदानकर्त्या आल्याने त्यांचे आरोग्य हे संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा विषय आहे. महिलांची शरीररचना, भावना, महत्वकांक्षा, चिंता या सर्व गोष्टी सखोल समजून घेतल्या तरच त्यांच्यासाठी सर्वोत्तम आरोग्य उपचार सेवा या उदयास आणता येतील. त्यामुळेच माहेर या विशेष विभागामध्ये कुटुंबकेंद्रित दृष्टीकोणाबरोबर अत्याधुनिक आरोग्य उपचार सेवा एकत्रित आणल्या गेल्या आहेत.