महाराष्ट्र

ग्राहक दिन व यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेशचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

हवेली प्रतिनिधी – अमन शेख

जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून १५ मार्च जागतिक ग्राहक दिन व यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेशचा ८ वा वर्धापन दिन दिनांक १५ मार्च रोजी मोठय़ा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष जयस्वाल, बाळासाहेब किसन झावरे, माजी प्रबंधक ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई व उपनियंत्रक – वैद्य मापन शास्त्र मुंबई मा. अॕडव्होकेट आनंद गवळी, लेखक व सल्लागार व संस्थापक/ अध्यक्ष व माजी मंत्री सूर्यकांत गवळी व इतर मान्यवर या सर्वांच्या शुभहस्ते आपले महामानव छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, बाबासाहेब व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्याला सुरुवात केली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना “यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे” माननीय संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री सूर्यकांत गवळी या कार्यक्रमाचे स्वरूप, व्याप्ती व रचनात्मक काम तसेच ग्राहक कायद्याचे महत्त्व या कार्यक्रमातून आपल्याला समाजाची, समाजामधील ग्राहकाची, जनजागृती कशी करता येईल, या संस्थेची येणारा कालावधीत कशी वाटचाल असेल याचं थोडक्यात स्पष्टीकरण व मार्गदर्शन केले .
हे कार्यक्रम तीन सत्रात पार पडले. यशवंत आधार प्रतिष्ठान या कार्यक्रमास जवळ जवळ महाराष्ट्रातून सगळ्याच जिल्ह्यातून पदाधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्याने उपस्थित होते.