हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख
करण रोहीदास हांडे (वय २०, रा. हांडेवाडी, ता. हवेली) याचा खून केल्याप्रकरणी सतिश मोहन चव्हाण ( वय २०, रा. हांडेवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करण रोहिदास हांडे हा रोहित गॅरेज हांडेवाडी येथे काम करीत होता. त्या परिसरात राहणारा सतिश मोहन चव्हाण यांची सुमारे चार वर्षापासून मैत्री होती. सतिश हा काहीएक कामधंदा करीत नाही. करण यांचे एक वर्षापुर्वी लग्न झाले आहे. तेव्हापासून करण हा सतिश सोबत फिरत नव्हता. त्याचे वागणे व्यवस्थीत नव्हते. म्हणून करण हांडे यांच्या कुटुंबियांनी आमचे घरी यायचे नाही व करण सोबत मैत्री ठेऊ नको असे अनेकदा सांगीतले होते.
सतीश हा करण यांस अधुन मधुन भेटण्याचा प्रयत्न करीत होता. करण याने त्यांस परत भेटु नये असे सांगीतले होते. त्याचे वडीलांनीही आमचे घरी यायचे नाही. करण यांस त्रास देवु नको असे अनेकदा सांगीतले होते. सुमारे आठ दिवसापुर्वी सतिश याने करण हा गॅरेज काम संपवून कामावरुन घरी येत असताना हांडेवाडी येथे थांबवुन तो त्याचे सोबत फिरावयास येत नाही त्याचे ऐकत नाही म्हणुन कोयता दाखवुन धमकी दिली होती असे करणने कुटुंबियांना सांगीतले होते. त्यावेळी सतिश ला घाबरून तक्रार दिली नव्हती.
१८ मार्च रोजी करण नेहमीप्रमाणे गॅरेजवर कामावर गेला. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारांस करण पत्नीस मयुर वजन काटा येथुन ॲक्टीवा गाडीवर घेवून घरी सोडणेस येत असताना शौर्यवाडा हॉटेल समोर सतिश याने त्यास शिवीगाळ केली. त्यानंतर पत्नीस घरी सोडून परत काहीएक न बोलता रागाच्या भरात निघुन गेला. तो त्या दिवशी रात्री घरी आला नाही. सर्वानी शोध घेतला असता तो कोठेही मिळून न आल्याने १९ मार्च रोजी त्याची पत्नी भुमिका हिने उरळी देवाची पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दिली. २० मार्च रोजी १२ वाजण्याच्या सुमारास शोध घेत असताना, हांडेवाडी येथील शौर्य हॉटेलचे मागे फर्निचर गोडावुनचे भिंतीजवळ के पी वाईन्स दुकानाचे शेजारील रिकाम्या जागेमध्ये कच्च्या रोडच्या गेटजवळ ॲक्टीवा गाडी मिळुन आली म्हणुन परिसरात शोध घेतला असता तेथुन पुढे भिंतीजवळ कात्रज बायपास रोडपासुन सुमारे १०० फुट आतमध्ये जमिनीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत एक इसम दिसुन आला. सदर माहिती पोलीसांना दिली. पोलीस आलेनंतर त्यांनी पुरलेल्या इसमास बाहेर काढले असता त्याचे गळयास वायरच्या सहयाने गळफास दिलेचे व डोक्यावर जखम असल्याचे दिसत होते. अंगावरील कपडे व कमरेचा बेल्ट, चेहरा ओळखुन पाहुन तो करण असल्याचे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगीतले.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास सतीश चव्हाण याचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु सतीश हा मोबाईल वापरत नसल्याने तसेच तो त्यांचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याने तो पोलिसांच्या हती येत नव्हता. परंतु तपास पथकाने सलग ७२ तास तपास करीत सीसीटीव्ही फुटेज पडताळणी व गोपनीय माहीती काढत असताना २३ मार्च रोजी यातील आरोपी सतीश चव्हाण हा हांडेवाडी परीसरात येणार असल्याची माहित सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या आदेशानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिगंबर साळुंके विश्रांती फणसे यांचेसह सापळा रचुन चव्हाण यांस ताब्यात घेवुन अटक केली . व त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५, नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांच्या पथकाने केली आहे.