रवि बारसागांडी सिरोचा तालुका प्रतिनिधि
सिरोंचा :-तालुक्यातील कंबालपेठा येथे बुधवारी दुपारी 1:30 सुमारास रामा कारे गावडे यांच्या घराला अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे. सदर बाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आञाम यांना माहिती होताच कंबालपेठा येते जावून पाहणी केली.तेव्हा गावातील नागरिकांनी सांगितले कि,अचानक घराला आग लागल्याने छतृछाया(घर)पूर्णपणे जडून खाक झाले आहे, घर आणि घरातील एकही जीवनावश्यक वस्तू धान्य, दागिने,व रक्कम जळाली असून फक्त अंगावरील कपडे उरले आहे.यामुळे गावडे कुटुंबातील सदस्यांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिवाराशी बोलुन घेवून कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. आणि रा. का. जिल्हा उपाध्यक्ष रामाकिष्टु निलम यांचेकडुन आगग्रस्त रामा गावडे यांच्या कुटुबियाना आर्थिक मदत करण्यात आले आहे यावेळी अशोक पेद्दी सुरेश जंगा, पोलिस पाटील तिरुपती गादे , कोरके गावडे, सुरेश आञाम व आदि गावकरी उपस्थित होते.