हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख
लोणी काळभोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अंगणवाडी च्या माध्यमातून किशोरवयीन मुलींची 11 ते 14 वयोगट यांची H B तपासणी लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आली त्यावेळी डॉ. रोकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 116 मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी लोणी काळभोर गावच्या सरपंच सौ.माधुरी ताई काळभोर या उपस्थिती होत्या त्यावेळी बोलताना मुलींना सक्षम करण्यासाठी अंगणवाडी च्या माध्यमातून वेळोवेळी असे कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले ,तसेच अंगणवाडी च्या माध्यमातून असे कार्यक्रम नेहमीच घेण्यात येतात ही खूप चांगली बाब आहे व यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांचा फार मोठा सहभाग आहे असेही त्या म्हणाल्या , या कार्यक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.धनश्री नायर , जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.यादव मॅडम,भोसले मॅडम, इंदलकर सर,मेमाणे सर,शिंदे सर,तसेच अंगणवाडी सेविका लता काळभोर, मनीषा रायकर,अलका काळभोर,राजश्री काळभोर, वैशाली वाळके,सुवर्णा म्हात्रे,मनीषा जांभुळकर हे उपस्थित होते.