हवेली

गुन्हे शाखा युनिट ६ ची उलखणीय कामगिरी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून, त्यांचेकडुन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघडकीस

हवेली तालुका प्रतिनिधी:-अमन शेख

लोणीकंद येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा,युनिट-६ कडून समांतर सुरू असताना, सदरचा गुन्हा हा पाटील इस्टेट येथील मोहन बनसोडे याने त्याच्या मावशी सोबत मिळून केला असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली.

ही माहिती गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांना माहिती दिली असता त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने सदर गुन्हयाचा तपास करत असताना दिनांक ०९/०४/२०२२ रोजी आरोपीचा शोध घेत असताना तो पाटील इस्टेट पुलाच्या खाली शिवाजीनगर, पुणे येथे आला असल्याचे माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी मोहन देविदास बनसोडे वय २१ वर्षे, रा. लेन नं ७, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे यास ताब्यात घेतले..

नमूद गुन्हयामध्ये त्यास अटक करून त्याची दिनांक १३/०४/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त करून, पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे तपास करता, त्याने त्याच्या मावशी सोबत पुणे शहरा मध्ये लोणीकंद व डेक्कन पो. स्टे. मधील दोन गुन्हे व समर्थ, सिंहगड रोड व कोंढवा पो. स्टे. मधील प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गुन्हयातील ४,९६,०८५/- रुपये किंमतीचे मुद्देमाल त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच काही दिवसापूर्वी गुन्हयातील सहआरोपी त्याची मावशी इलेक्ट्रीक शॉक लागुन मयत झाल्याचे त्याने सांगितले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे ,सचिन पवार, ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.