प्रतिनिधी – स्वप्नील कदम
पुणे : लोणी काळभोर येथील मान्यवर कांशीरामजी साहेब विचारमंच पुणे,
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कोविड योध्दा पुरस्कार जाहीर करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव दिपकभाऊ आढाळे यांना देण्यात आले.
तसेच कदमवाकवस्ती गावाचे पोलीस पाटील प्रियंकाताई श्रीकांत भिसे यांना सन्मान पत्र देण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व मानवजातीला रक्षणासाठी अहोरात्र काम करत होते त्याची दखल म्हणून संघटनेच्या वतीने कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी बहुजन मुक्ती पार्टी चे अध्यक्ष श्रीकांतदादा ओव्हाळ, युवा रक्षक भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद भाऊ बेगंळे, सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.