पुणे

अवैधरित्या पिस्टलची विक्री करणा-या सराईत आरोपीस जेरबंद करून त्याच्या कडून जप्त केले ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एकुण ११ पिस्टल

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे शहरामध्ये अवैधरित्या अग्निशस्त्रे वापरणाऱ्या तसेच विक्री करणा-यांवर आळा बसावा या करिता मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ पुणे शहर कडील पोलीस पथक हे युनिट-६ च्या हद्दीमध्ये गस्त करत असताना दिनांक १८/०४/२०२२ रोजी पोलीस पथकास एक इसम हा केसनंद रोड, वाघोली पुणे येथे पिस्टल विकण्याकरिता येणार असल्याची बातमी मिळाली.

ह्या बातमी ची माहिती श्री गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर यांना दिली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस पथकाने केसनंद रोड, वाघोली येथे सापळा रचून सावशीत व्यक्ती नाम ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे, वय २१ वर्षे, रा. सध्या कुहाड पार्किंग, लखन ढगे यांचे खोलीत, शनि शिंगणापूर, ता. नेवासा जि. अहमदनगर मुळगांव-मु. पो. टेंभी अंतरवाली, ता. घणसांगवी, जिल्हा जालना यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०३ पिस्टल जिवंत काडतूसे मिळून आले. त्याच्या जवळील पिस्टल हे त्याने विक्रीकरिता आणल्याचे सांगितल्याने त्याच्यावर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून, त्यास नमूद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असून, त्यास मा.न्यायालया मध्ये हजर करून त्याची दिनांक २५/०४/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक श्री गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार.
आरोपीकडे पिस्टल मिळून आल्याने त्याचा शस्त्रे बाळगण्याचा नेमका काय उद्देश होता, तसेच ती शस्त्रे कोठून आणली. यापूर्वी कोणास शस्त्रे विकली आहेत का याबाबत पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता त्याने कबुली दिली १) निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार, वय २३ वर्षे रा. एमआयटी कॉलेज जवळ, लोणी काळभोर, पुणे यास २ पिस्टल २ जिवंत काडतूसे, २)युवराज बापू गुंड, वय २४, रा. पांडवनगर, वडकी गाव, ता. हवेली, जि. पुणे यास १ पिस्टल व १ जिवंत काडतूस व ३)अमोल नवनाथ तांबे, वय २७ वर्षे रा.गोटूंबे आखाडा ता. राहूरी, जि. अहमदनगर यास २ पिस्टल २ जिवंत काडतूस विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अटक करून त्यांच्याकडून त्यांनी खरेदी केलेले पिस्टल व काडतूसे पंचनाम्याने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच आरोपी ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे, वय २१ वर्ष याच्या घरातून ३ पिस्टल ३ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

अशाप्रकारे आरोपी यांचेकडून एकूण ३.३५,६००/- रु किंमतीची १५ पिस्टल व १४ जिवंत काडतूसे नमूद गुन्हयामध्ये जप्त करण्यात आली आहेत. सदर तपासा मध्ये आरोपी शंकर नायक, रा उज्जैन, मध्ये प्रदेश याच्याकडून अग्निशस्त्रे आणून पुणे परिसरामध्ये विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.