हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
पुणे शहरामध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणा-या लोकांवर आळा बसावा या करिता कायदेशीर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले होते.
आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-६. पुणे शहरकडील पोलीस पथक हे युनिट ६ च्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना, दिनांक २४/०४/२०२२ रोजी पोलीस पथकास काही इसम हे लोणी काळभोर पो. स्टे च्या हद्दी मध्ये वडकी पुणे येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधील मुंबई विरुध्द लखनऊ यांच्यामध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅचवर पैशांवर जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी जावून छापा टाकला असता १) परेश मोहन भूत, वय ३७ वर्षे, रा. फुलवाला चौक गुरूवार पेठ पुणे व २) प्रफुल्ल नरेंद्र कलावटे वय ३७ वर्षे, रा. फुलवाला चौक गुरूवार पेठ पुणे ३) अक्षय पांडूरंग ठोंबरे वय २६ वर्ष रा. शिवराधानगर, वडकीनाला, पुणे ४) महेश राजेंद्र क्षिरसागर, वय २३ वर्षे, रा. शिवराधानगर, वडकीनाला, पुणे हे सट्टा खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळावरून सट्टा खेळण्याकरिता वापरलेले एकूण १० मोबाईल हॅन्डसेट, कैलक्यूलेटर, मार्कर पेन, नोंदवही असा ६७,६२०/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सट्टा घेण्याकरिता बनावट कागदपत्रे सादर करून मोबाईल दुकानातून सिमकार्ड खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अमलदार मच्छिद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर व महिला पोलीस अंमलदार ज्योती काळे यांनी केली आहे..