पुणे

संजय मोडक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संजय मोडक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय मोडक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोडक इंटरनॅशनल स्कूल लोणकाळभोर येथे मुलांनी वाढदिवसाच्या निमित्ताने स्कूल मध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी दरवर्षी प्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्कूल मधील प्रिन्सिपल श्रुतीरंजन बारीक यांनी मुलांना  मार्गदर्शन केले. मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. गेली दोन वर्ष मुले ऑनलाईन शिक्षण घेत होते. त्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढता येईल यावर आपण भर देऊन मुलांना एक उच्च दर्जाचे शिक्षण देऊ तसेच मुलांना शैक्षणिक बाजू चांगली बनवून मुलांना तैयार करू असे योग्य मार्गदर्शन केले. संजय मोडक यांनी मुलांना पुढे जाऊन कॅरिअर कसे बनवता येईल याविषयींचे मार्गदर्शन केले.शिक्षकवर्ग, मनिषा मोडक व  अनेकांनी आपले मनोगत वक्त केले.

यावेळी मुलांनाही योग्य मार्गदर्शन केले व झाडे लावा झाडे जगवा असा नाराही दिला. व त्याचे महत्व पटवून दिले.यावेळी उपस्थित मान्यवर गावचे सरपंच अरुण गायकवाड उपस्थित होते. मुलांना कोरोना गेला असला तरी योग्य काळजी कशी घ्यावी हे सांगितले.