हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
दोघा अट्टल मोटारसायकल वाहन चोरास गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने गजाआड करुन त्यांच्याकडून तीन लाखाची तब्बल 15 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अलिकडे वाहन चोरीच्या तक्रारीत मोठी वाढ झाल्याने याचा छडा लावण्याची जबाबदारी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडे वर्ग करण्यात आला यावर या पथकाने तपासासाठी आपल्या हाथखंड्याचा अवलंब करण्यास सुरुवात केली.त्यानुसार या पथकास माहिती मिळाली की,या गुन्ह्यातील इसम वाघोली येथील बाजार तळावर येणार असल्याचे कळले.त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या पथकासह तेथे सापळा रचून 1)निलेश बाळासाहेब शिवरकर,रा.आळंदी म्हातोबा (पानमळा) ता हवेली 2)प्रशांत संपत चव्हाण रा निमगाव म्हाळुगे ता शिरुर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दुचाकी वाहना बद्दल चौकशी केली असता त्यांनी ती मोटारसायकल आळेफाटा येथून चोरल्याचे सांगितले.यावर या दोघांना न्यायालयासमोर हजर करुन अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली ती मिळाल्याने त्यांच्याकडून सात पोलीस स्टेशन परिसरातील एकुण 15 मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.या सर्व मोटारसायकलची किंमत तीन लाखांहून अधिक आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, .पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त ,गुन्हे, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा,श्रीनिवास घाडगे,सहा. पोलीस आयुक्त,गुन्हे-२,.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६
चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल
खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.