हवेली

पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर या परिसरातील गावांमध्ये हिंदू मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन ईद साजरी केली.

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

मुस्लिमांचा सर्वात मोठा व पवित्र सन “रमजान ईद” आहे.कदम वाकवस्ती मधील नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा गळाभेट घेऊन दिल्या. व लहान मुलांचे पारंपारिक पोशाखात खूप आकर्षक दिसत होते. व ईद्दी मिळाल्यामुळे आनंदाने लहान मुले ईद भेटत होते. तब्बल दोन वर्षे देशात करोना काळानंतर कोणताच सण उत्साहत साजरा करण्यात आला नव्हता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास चंद्रदर्शन झाले. चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करतात. त्यानुसार त्यांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केली.

कदम वाकवस्ती परिसरातील मस्जिद मध्ये मुस्लिम नागरिकांनी नमाज अदा केले. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कदम-वाकवस्ती मधील (नवपरिवर्तन फाउंडेशन) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नासीर पठाण ,शबीर पठाण ज्ञानेश्वर नामुगडे, भगवा प्रतिष्ठान चे सस्थापक अध्यक्ष अभिजित बडदे ,तसेच अमोल टेकाळे,समीर खान, भगवा प्रतिष्ठान व जय हिंद ग्रुप व सर्व हिंदू मुसलीम बांधव उपस्थित होते.
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व परिसरातील गावांमधील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्या निमित्ताने जातीभेद न बाळगता सर्व बांधवांना आपल्या घरी शीर खुर्मा खाण्यासाठी बोलाविले होते. यावेळी हिंदू आणि मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पूर्व हवेलीतील मशिदींच्या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.