पुणे (अनिल मोरे – रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
अजान व भोंग्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची हडपसर मध्ये सभा होत आहे, हडपसर मधील सेनेच्या नेत्यांनी सभेची जोरदार तयारी केली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व मनसेचा कसा समाचार घेतात याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या मागे इडी, सीबीआय च्या धाडी त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीद समोरील अजानचे भोंगे बंद करा अन्यथा हनुमान चालीसा लावणार यावरून आंदोलन सुरू केले आहे, यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे, राज्य सरकारने निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिल्याने निवडणूक अटळ आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा पुण्यात हडपसर मध्ये दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
राज्यात सत्ताधारी विरोधकांची आरोपांची धुलवड…
राज्यात सध्या मोठी राजकीय धुलवड सुरू आहे, शिवसेनेचे आक्रमक नेते खा.संजय राऊत महाविकास आघाडीच्या वतीने विरोधक भाजप विरोधात किल्ला लढवत आहेत, त्यातच राज्यातील भोंगे हनुमान चालीसा वरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याने राज ठाकरे यांनी सभांमधून मुख्यमंत्री व आघाडीच्या नेत्यांना लक्ष केल्याने वातावरण चिघळले आहे, पत्रकारांना सामोरे जात संजय राऊत यांनी विरोधकांना नामोहरम केले आहे, वेळप्रसंगी शेलक्या भाषेत समाचार घेत असल्याने सध्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून राऊत पुढे आले आहेत, याच संधीचा फायदा घेण्यासाठी व आगामी महापालिका निववडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांची सभा घेत हडपसर च्या नेत्यांनी बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या प्रभागात होतेय सभा…
पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात होती, भाजप सत्ताधाऱ्यांनी अनेक भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने रान उठविले होते, त्यात खा.संजय राऊत यांच्या सभेत विरोधकांवर पलटवार होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने या सभेकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आगामी पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन..
खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यात माळवाडी येथील शिवसेना भवन या इमारतीचे उदघाटन, व कै. खा.विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह समोर भव्य सभेचे आयोजन केले असून वेळ कमी मिळाला असला तरी जय्यत तयारी केली असल्याचे आयोजक जिल्हाप्रमुख विजय देशमुख, माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी सांगितले.
आज गुरुवार सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या सभेला विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख सचिन अहिर, माजी मंत्री विजय शिवतारे, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर,आगामी पालिका निवडणुक पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी हडपसर मध्ये फ्लेक्सबाजी करून शक्तिप्रदर्शन ची जोरदार तयारी केली आहे.