Uncategorized

“इंग्रजी शिक्षणाचा मूलभूत हक्क सर्वसामान्यांना सुद्धा मिळावा – आमदार चेतन तुपे” – लिटिल रुट्स स्कुलचे उद्धघाटन संपन्न

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये लाखो रुपये फी सामान्यांना परवडत नाही, शिक्षण मूलभूत गरज असल्याने सामान्यांना परवडेल असे शिक्षण घेण्यासाठी घुले कुटुंबीयांनी पुढाकार घेतला हे कार्य कौतुलकास्पद आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केले.
गोपाळपट्टी येथील लिटिल रुट्स प्रीस्कुल चे उद्धघाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी सरपंच शिवराज घुले, सागरराजे भोसले, साधना बँकेच्या उपाध्यक्षा रोहिणी तुपे, दिलीप टकले, प्रशांत घुले, सागर शेळके, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राज्य सहसंघटक अनिल मोरे, संजय घुले, भारती तुपे, रमेश तुपे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यातच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अवाक्याबाहेर गेले आहे म्हणून येथे सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व सुविधांनी युक्त स्कुल सूरु केल्याची माहिती संस्थेच्या संचालक आकाश पंडित घुले, आरती किरण वाळके, आश्विनी शेखर तुपे यांनी सांगितले.
लिटिल रुट्स प्रिस्कुल मध्ये उच्च दर्जाचे शिक्षण व सुविधा मिळणार असल्याने परिसरातील मुलांसाठी हि एक पर्वणी आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना या स्कुलमधून माफक दरात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांना फुलांचे झाड देऊन सन्मानित करण्यात आले.