पुणे

“शहरी गरीब योजना क्षेत्रीय कार्यालय स्तरावर राबवा” – विधवा, दिव्यांग यांना तीन लाख तरतूद करा – अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन मा. नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या शहरी गरीब योजनेच्या कार्यालयाचा विस्तार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करून खर्चाची रक्कम वाढवावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 15 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शिवसेना नेते व माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी भेट घेतली व आपल्या मागण्या मांडल्या.
निवेदनात भानगिरे यांनी म्हटले आहे, पुणे महापालिकेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मोफत उपचार व्हावेत म्हणून शहरी गरीब योजना सुरू आहे, या सुविधेची प्रक्रिया करण्यासाठी शिवाजीनगर येथील आरोग्य खात्याच्या मुख्य कार्यालयात चकरा माराव्या लागतात, रूग्ण रुग्णालयात दाखल असतात किंवा करायचे असतात मग नातेवाईकांची धावपळ होते व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य इमारत मध्ये होणारी गर्दी व लागणारा वेळ लक्षात घेता पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयात शहरी गरीब योजनेचे कार्यालय सुरू व्हावे या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंत वैदकीय खर्च दिला जातो, यामध्ये विधवा, निराधार महिला, दिव्यांग यांना मर्यादा तीन लाख करावी अशी आग्रही मागणीही नाना भानगिरे यांनी आयुक्तांकडे केली आहे, येत्या 15 दिवसात या मागणीचा सकारात्मक विचार करून कार्यवाही न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

सामान्यांचे गाऱ्हाणे ऐका नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन
शहरी गरीब योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात पुण्यातील नागरिकांना होत आहे, पण एकच कार्यालय असल्याने होणारी दिरंगाई मनस्ताप देणारी आहे, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ही योजना राबवावी तसेच विधवा, अंध, दिव्यांग यांना तीन लाख द्यावेत ही मागणी आज आक्तांकडे केली आहे, आयुक्तांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, 15 दिवसांत कार्यवाही नाही झाली तर या न्याय मागणीसाठी आंदोलन करणार.
प्रमोद नाना भानगिरे
मा.नगरसेवक पुणे मनपा