हडपसर

अवैधपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूच्या अड्ड्याचे लोणी काळभोर पोलीस ठाणे कडून करण्यात आले समुळ उच्चाटन एकूण २१०००/ रू किमतीचा मुद्देमाल केला नष्ट

प्रतिनीधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर – पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार पो.हवा संतोष होले यांना दि.२४/०५/२०२२ रोजी बातमी मिळाली की,लोणी काळभोर गावाचे हद्दीत इंदलकर वस्ती डावे बाजूला, रामदरा रोडच्या जवळील मोकळ्या जागेत, लोणी काळभोर, हवेली पुणे येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी चालु आहे. आशी खात्रिशिर बातमी मिळाल्याने नमुद बातमीचा आशय पो.हवा होले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री .राजेंद्र मोकाशी यांना माहिती दिली असता त्यांनी सोबत आवश्यक तो स्टाफ देऊन पुढील कारवाई बाबत सूचना दिल्या.त्या प्रमाणे नमूद पथकाने १३/४५ वाजण्याच्या सुमारास नमूद ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी एका पत्र्याचे भाड्यामध्ये गूळ ,तुरटी व पाणी असे अंदाजे एक हजार लीटर रसायन दिसून आले. तेंव्हा त्या बाबत आधिक चोकशी केली असता सदर चे साहित्य हे इसम नामे सुक्रिया सरदार रजपूत, रा. लोणी काळभोर,हवेली, पुणे याचे असलेबाबत समजले तेव्हा सदर ठिकाणी असणारे मालाची पाहणी केली असता नमूद ठिकाणी १)२००००/ किमतीचे एका मोठ्या पत्र्याचे भांड्यात एक हजार लीटर गावठी हाथभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन
२)१०००/ रू एक मोठ्या पत्र्याचे भांडे असा मिळून आला असुन नमूद माला पैकी आवशक तेवढे सेंपल करता नमुना घेण्यात आले. नंतर सदर चा माल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०५, मा.श्री.बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. श्री.सुभाष काळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे), लोणी काळभोर पोलीस ठाणे, तसेच लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पो. हवा. संतोष होले,पो.हवा सुनील शिंदे,पो.ना. अमित साळुंखे,पो. शि वीर, पो. शि राजेंद्र दराडे यांच्या पथकाने केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अमिताभ गुप्ता व सह आयुक्त पुणे शहर, मा. डॉ. रवींद्र शिसवे, यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार,बेकायदेशीर धंदे करणारे, तसेच शरीर व माला विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून यांचे समूळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.