हडपसर / पुणे : (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हडपसर गाडीतळ येथील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात कारागृह अधिकाऱ्याच्या मुलाचा खून झाला होता. मंगळवारी (ता. २४ ) झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
वर्षा सुरेश कमाने उर्फ महेक अरमान शेख (वय २०, रा. काळे बोराटेनगर, हडपसर), अरबाज उर्फ अरमान अल्लाउद्दीन शेख (वय २१), भैय्या उर्फ प्रदीप अंकुश चव्हाण (वय- २०), व आकाश जगन्नाथ देवकाते (वय २०, सर्व रा. माढा, ता. माढा, जि सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याने त्याला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री गिरीधर उत्तरेश्वर गायकवाड (वय २१, रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर, मांजरी, मूळ रा. उरुळी कांचन) या तरुणाचा हडपसर गाडीतळ येथील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात धारदार हत्याराने खून करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीधर आणि आरोपी वर्षा कमाने एकाच कॉलेजमध्ये शिकत होते व दोघेजन मित्र होते. अरबाज उर्फ अरमान याच्यासोबत वर्षाचा प्रेमविवाह झाला होता. तसेच काही महिन्यांपासून ती काळेबोराटेनगर येथे आई-वडिलांकडे रहायला आली होती. अरबाज वर्षाला भेटायला तिच्या घरी गेला असता त्याने तिचा मोबाइल तपासला यामध्ये तिचे गिरीधरसोबत बारा वेळा संभाषण झाल्याचे पाहिले.
दरम्यान, दोघे संपर्कात असल्याचा संशय आल्याने त्याने वर्षाला गिरीधरला ग्लायडिंग सेंटरच्या आवारात बोलावण्यास सांगितले. आरोपी आणि गिरीधरमध्ये त्या ठिकाणी वाद झाले. यातून अरबाजसह साथीदारांनी धारदार हत्यारांनी वार करून गिरीधरचा खून केला. या घटनेनंतर सर्व जण फरारी झाले. वर्षा तिच्या आई-वडिलांच्या घरी पळून गेली, तर इतर आरोपी सासवड बाजूला निघून गेले. पोलिसांनी आरोपींना बदलापूर येथून अटक केली आहे.