बंटर स्कूल हडपसर येथे पार पडलेल्या महाराष्ट्रातील पहिलाच महिला सुरक्षा जनता दरबार व उललेखनीय सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचा त्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचे काम त्यांना पुरस्कार रूपी शाबासकी देऊन त्यांच्या कार्यास अधिक बळ देण्याचे कार्य स्वराज्य सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अभिजीत दादा बोराटे यांच्या माध्यमातून
यावर्षीचा क्रीडा रत्न पुरस्कार क्रीडाशिक्षक कराटे प्रशिक्षक श्री हेमंत डोईफोडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार
मा.सौ चित्राताई वाघ ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा,माजी कॅबिनेट मंत्री ) नगरसेवक मा.श्री मारुती आबा तुपे, युवानेते अभिजीत दादा बोराटे या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात.शाल श्रीफळ मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल कुमिते कोच परीक्षामध्ये कराटे प्रशिक्षक सेन्साई हेमंत डोईफोडे यांना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन कराटे कोच लायसन 𝙺𝙰𝙼 अध्यक्ष शिहान सलाउद्दीन अन्सारी,जनरल सेक्रेटरी शिहान संदीप गाडे यांच्या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित किक-बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिरामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमी विद्यार्थ्यांचे भरघोष यामध्ये नंदिनी चव्हाण,दिव्या चव्हाण,तन्वी भिसे,गौरी भिसे,नंदिनी भोईटे,श्रावणी काळे,कशिश घाडगे,अनुष्का भोसले, रुद्रांश फराटे, वैभव रसाळ अलोक पवार,अभिषेक जाधव,चैतन्य कराड,मनिरुद्र शिंदे,चैतन्य कुंभार या खेळाडूंनी यश संपादित केले.या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या सर्वच खेळाडू व प्रशिक्षकांच्या सक्रियतेचे आणि घवघवीत यशाचे कौतुक सर्व क्षेत्रातुन होत आहे. सर्वांचे अभिनंदन पालक विद्यार्थ्यांनी केले.