कवठे येमाई (प्रतिनिधि धनंजय साळवे) – अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज कवठे येमाई येथे उत्साहात साजरी करण्यात आली.अहिल्याबाई होळकर याचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यातुन तरुण मंडळाकडुन ज्योत आणण्यात आली.यावेळी ह्या ज्योतीची संपुर्ण गावातुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.यात तरुण वर्गाचा उत्साह खास जाणवत होता.त्यानंतरअहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. हिंदु समाजाला आज अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराची गरज आहे. त्यांचे विचार अंगिकारले पाहिजे.यावेळी करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले.त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.