ग्रामीण भागातील पथदिव्यांचे कनेक्शन कापण्याची अन्यायकारक मोहीम बंद करा- शशिकांतजी मंगळे
विज कापणे बंद न केल्यास प्रशासनाला भोगवे लागणार गंभीर परिणाम
अमरावती (प्रतिनिधी)
वीजबिल न देता थकीत बीलाच्या नावाखाली अंजनगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील पथदिव्यांचे कनेक्शन कापन्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली आहे.
मार्च २०२१ पर्यंत शासनाने संपूर्ण ग्रामपंचायतीचे स्ट्रीट लाईट बिलाचा भरणा केला आहे. पण एप्रिल २०२१ पासुन मार्च २०२२ पर्यंत ची विजेची बिलेच ग्रामपंचायतला दिले नाहीत तरी अंजनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विज वितरण कंपनीला स्ट्रीट लाईट बिलाचे २ टप्पे भरलेआहेत.मात्र कोणतेही विज बिल न देता पथदिव्यांचे कनेक्शन कापण्याची कामे विज वितरण कंपनी करत आहे.त्या संदर्भात कसबेगव्हाण चे सरपंच माननीय शशिकांतजी मंगळे यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन नुकतीच चर्चा केली
ऐन पावसाळा जवळ आलेला असतांना ग्रामीण भागातील पथदिवे बंद करण्याची दुर्बुद्धी वीज वितरण कंपनीला सूचली आहे.पावसाळ्यात साप,विंचू यांची भीती ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक असते.शिवाय पेरणी पाण्याची लगबग, मजूरांची व्यवस्था लावणे ही कामे दिवसभर शेतात काम करून आल्यानंतर सायंकाळी करतो म्हटलं तर गावातील पथदिवे सुरू असणे नितांत गरजेचे आहे. पण वीज वितरण कंपनीने आपल्या तुघलकी निर्णयावर फेरविचार केला नाही तर ग्रामपंचायती अन्याय सहन करणार नाहीत वेळ आल्यास तोडलेली स्ट्रीट लाइट आम्ही स्वतः जोडू.असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कसबेगव्हाणचे सरपंच शशिकांतजी मंगळे यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे.
त्या संदर्भात आज सतीश नंदवंशी (उपकार्यकारी अभियंता, अंजनगाव सूर्जी) व श्रुगारे साहेब( कार्यकारी अभियंता, अचलपूर ) यांच्या सोबत चर्चा केली.नियमांनी व शांततेत विचार विनिमय करून काम केल्यास विज वितरण कंपनीला सहकार्य करू पण ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्या विरोधात सडेतोड भूमिका घेणार असल्याचे शशिकांत मंगळे यांनी सांगितले.