पुणे

अवैधपणे हातभट्टी दारूच्या अड्यांचे लोणी काळभोर पोलीस ठाणे कडून करण्यात आले समुळउच्चाटन,एकूण २१०००/- रू किमतीचा मुद्देमाल केला नष्ट

प्रतिनीधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पोलीस हवा/४३२ गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, राठोड वस्ती , कॅनॉल चे कडेला, शिंदवणे, ता.हवेली , जिल्हा पुणे येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्या करीत हाथभट्टीचे रसायन व साहित्यसह गावठी दारू बनवीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने नमुद बातमीचा आशय पोलीस हवा/४३२ गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना माहिती दिली असता त्यांनी सोबत आवश्यक स्टाफ देऊन पुढील कारवाई करण्या बाबत सूचना दिल्या त्या प्रमाणे नमूद पथकाने १६/४५ वा. चे सुमारास नमूद ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन मोठ्या पत्र्याचे भांड्यात गूळ, तुरटी व पाणी यांचे अंदाजे दोन हजार लीटर रसायन व सहित्यानिशी गावठी दारू बनवीत असताना इसम नामे १) पंखाबाई व्यंकट राठोड वय -५२ वर्ष. रा.राठोड वस्ती , शिंदवने, ता.हवेली, जिल्हा पुणे २) मंदाराणी शाखा राठोड वय-५२ वर्ष रा. राठोड वस्ती, शिंदवणे ता. हवेली, जि. पुणे ३) शंकर फुलसींग राठोड वय-३४ वर्ष रा. लाडवस्ती, सोरतापवाडी ता. हवेली, जि. पुणे ४) अक्षय देविदास मुसळे वय -३२ वर्ष रा.जयमल्हार रोड,बाजार मैदानाजवळ, गुगळे किराणा दुकानाच्या मागे उरुळी कांचन ता.हवेली, जिल्हा पुणे हे मिळून आले. सदर ठिकाणी असलेल्या रसायन व साहित्याची पाहणी केली असता नमुद ठिकाणी १) २०,०००/ – रु किमतीची दोन मोठ्या पत्र्याच्या भांड्यात दोन हजार लीटर गावठी हाथभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन कि.अं.प्रती लि.१० रू याप्रमाणे २) १०००/- रू दोन पत्र्याचे भांडे अंदाजे १००० लि. मापाचे जु.वा.कि.अं.असा माल मिळून आला असुन नमूद माला पैकी आवश्यक तेवढे सॅम्पल करिता नमुना घेण्यात आल्यानंतर उर्वरीत माल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे.
सदरची उल्लखनिय कामगिरी मा. श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर मा. श्री संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -५ , मा. बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सपोनि/ राजू महानोर, यांचे सोबत पोहवा/ नितीन गायकवाड संतोष होले, पोना/ श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉ. राजेश दराडे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, दिगंबर साळुंखे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.