हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्ती गावा मधील संभाजी नगर येथील वीज पुरवठा शुक्रवार दुपारी २ वाजल्या पासुन खंडित झाला होता, त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी पाहणी केली असता तेथील रोहित्रा मध्ये मोठा बिघाड झाल्याचे निदर्शनात आले व महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कळवले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला असता रोहित्र जळाले असल्याने तात्काळ दुरुस्ती होत नसल्याचे लक्ष्यात येताच त्यानंतर
शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक (बापू) पवार यांच्याशी मा. उपसरपंच सुनिलनाना कदम, मयुर शेठ कदम महावितरण कमिटी सदस्य रमेशजी मेमाणे कदम-वाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य नितिन लोखंडे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व संभाजी नगर /कदमवस्ती चे रोहित्र जळाले असल्याची माहित आमदार अशोक (बापू) पवार यांना दिली व दु ४:३० वा आमदार अशोक (बापू) पवार यांनी महावितरन चे अभियंता मा. राठोड साहेब यांच्यांशी दूरध्वनी वरून संपर्क करून त्वरीत रोहित्र उपलब्ध देण्यात यावा सांगितले महावितरण अधिकाऱ्यांनी त्वरित दुसरे रोहित्र उपलब्ध करून दोन तासात रोहित्र बसवण्यात आला, कदमवस्ती व संभाजी नगर येथील नागरीकांनी आमदार अशोक (बापू) पवार व स्थानिक नागरिकांनी केलेल्या कामाचे मनापासुन आभार मानले.
पोकळे साहेब,कोडिलकर साहेब बालाजी क्रेन सर्विस व किसन मामा कदम,शेख साहेब,लाड साहेब यांचे खूप मोठे सहकार्य झाले.