महाराष्ट्र

कवठे येमाई ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

कवठे येमाई (प्रतिनिधी धनंजय साळवे) -दिनांक सहा जुन रोजी दरवर्षी राज्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला जातो.याही वर्षी राज्यात अनेक ठिकाणी तो साजरा केला गेला.शिवाजमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.  आजही हा दिन शिवप्रेमी उत्साहात साजरा करतात.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता.हा दिन प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर चैतन्याची आनंदाची गुढी उभारुन साजरा केला पाहिजे असे सा.कार्यकर्ते रामदास सांडभोर यांनी सांगितले.
कवठे येमाई येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुढी उभारुन व छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पुजन करुन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ सा.कार्यकर्ते रामदाजी सांडभोर,उपसरपंच विठ्ठलराव मंजाळ,ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हाळ,मा.सरपंच दिपकभाऊ रत्नपारखी,ग्रामपंचायत सदस्य रामदास ईचके, गणेश उघडे, येस क्लबचे अध्यक्ष नवनाथशेठ सांडभोर,सा.कार्यकर्ते निलेश पोकळे, कवठे वि.का.सोसायटी चेअरमन विक्रमशेठ ईचके,संचालक दत्ताशेठ पडवळ,शिरुर तालुका रेशन दुकानदार संघटना सचिव गणेशजी रत्नपारखी ,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.