हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
या वेळी रामा कृषी रसायन लिमिटेड कंपनीतील सरव्यवस्थापक व्हि के पांडे, व्यवस्थापक आर एन शर्मा, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच माधुरी काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भारती काळभोर, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, माजी उपसरपंच राजाराम काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष अमित काळभोर, ग्रीन फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता घुले, मधुकर कुमावत, हभप नितीन महाराज जंजीरे, नवनाथ गायकवाड, ग्रीन फाउंडेशनचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.
या वृक्षारोपणातील झाडांना पाण्याची सोय व्हावी म्हणून तीर्थक्षेत्र रामदरा येथील तलावातील पाणी नेण्यासाठी १५०० फुट पाईप लाईन साधना बॅकेचे संचालक बाळासाहेब कोळपे यांच्या वतीने देण्यात आली. या परिसरात पाणी साठवण्यासाठी ५००० लिटर क्षमतेची टाकी माजी सैनिक बळीराम वायकर यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्चाला फाटा देत दिली. रामा कृषी रसायन कंपनीच्या वतीने १० ते १२ फुटी उंचीचे ५०० वृक्ष देणगीदाखल देण्यात आले. तसेच प्रयत्न डेव्हलपर्स यांच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहिमेसाठी १०,००० चा निधी वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांनी दिला. झाडांना पाणी व मोटर तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय यांच्या वतीने देण्यात येणार आहे. रामा कृषी रसायन कंपनीकडून वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, खैर, आंबा, चिकू, जांभूळ, कदंब अशा अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भोसले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राहुल कुंभार यांनी मानले.