हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्ती गावच्या हद्दी मध्ये पालकीस्थळ परिसरात पोलीस गस्त घालत असताना, पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना एक व्यक्ती काळ्या रंगाचा शर्ट घातलेला विशाल सुरवसे हा लोखंडी कोयता घेऊन इंदीरानगर जवळील पाण्याच्या टाकीजवळ फिरत असल्याची माहिती एका बातमीदारा कडून मिळाली. मिळालेल्या माहितीची खातीरजमा करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले असता, पोलिसांना त्या ठिकाणी विशाल सुरवसे हा संशयीतरित्या थाबलेला दिसुन आला. व विशाल सुरवसे हा पोलिसांना बघताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला . तेव्हा पोलीस अंमलदार राजेश दराडे यांनी आरोपीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विशाल पांडुरंग सुरवसे, वय २० वर्ष, रा. घोरपडेवस्ती, लेन. नं.११. लोणीकाळभोर ता. हवेली, जिल्हा-पुणे असे असल्याचे सांगितले. व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या मागील डावे बाजुस एक धारधार धार असलेला लोखंडी कोयता मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढिल तपास पोलीस नाईक श्रीनाथ जाधव हे करीत आहेत.
ही उल्लेखनिय कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे लोणी काळभोर यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, राजेश दराडे, बाजीराव वीर, दिगंबर साळुंके, मल्हार ढमढेरे आणि विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.