हवेली

दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी पाठलाग करून केले अटक

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली तालुक्यातील नायगाव येथील संतोष कैलास पाडळे यांना रोडवर शिवीगाळ करून हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, संतोष पाडळे यांना नायगाव ( ता. हवेली) येथील आदर्श कॉलनीच्या रस्त्यावर ३१ मे २०२० रोजी सायंकाळी साडेआठ वाजणाच्या सुमारास सहा ते आठ जणांच्या टोळक्याने चाकू व लाथा बुक्यांनी मारून खून करण्याचा पर्यंत केला होता. या याप्रकरणी पाडळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजू माहानोर व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. तसेच या घटनेचा तपास करीत असताना पथकातील पोलीस अमंलदार शैलेश कुदळे यांना गोपनीय बतमीदारा कडून माहिती मिळाली नायगाव येथील फरार असलेल्या दोन आरोपी प्रशांत शिंदे आणि सागर गायकवाड हे प्रयागधाम गेटचे समोर थांबलेले आहेत. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक महानोर यांना कळवले व त्यांनी सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा. राजेद्र मोकाशी यांना कळवले असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करवाही करण्याचे आदेश दिले व पोलीस अंमलदार शैलेश कुंदळे, पोलीस अंमलदार बाजीराव वीर असे सदर ठिकाणी जाऊन मिळाले बातमीप्रमाणे खात्री केली असता तेथे बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसुन आले म्हणून ते सदर इसमास पकडण्यासाठी गेलो असता त्यास पोलिसांची चाहुल लागल्याने ते दोघे तेथुन पळुन जावु लागले असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर पकडले. पकडलेल्या इसमांस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) प्रशांत कुंडलिक शिंदे वय २६ वर्ष, रा. आदर्श कॉलनीचे पाठीमागे, नायगाव ता.हवेली, जिल्हा पुणे २) सागर दत्तात्रय गायकवाड, वय २८ वर्ष, रा. भिल्ल वस्ती, नायगाव ता.हवेली, जिल्हा पुणे असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. म्हणुन त्यास ताब्यात घेण्यात आले व पुढिल तपास पोलीस उप निरीक्षक अमित गोरे करीत आहे.. सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. राजेंद्र मोकाशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांच्या सोबत नितीन गायकवाड, संतोष होले, पोना / श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, दिगंबर साळुंके, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे..