पुणे (अनिल मोरे – रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन)
पुण्यात अपघात अन शस्त्रक्रिया प्रमाण वाढत चालले असुन रक्ताची खूप गरज आहे, त्यातच रक्तदात्यांनी दुर्लक्ष केल्याने ब्लड बँका व हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, रक्ताभावी अनेकांना जीव गमवावा लागत असल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन नोबल हॉस्पिटलचे संचालक व ब्लड बँक प्रमुख डॉ.एस.के.राऊत यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात 72 वर्षीय वृद्धाचा अपघात झाला प्रचंड रक्तस्त्राव झाला तेव्हा तीस नातेवाईकांना फोन करून एक रक्तदाता रक्तदान करण्यास आल्याने संवेदनशील मनाला अक्षरशः सुन्न करणारी घटना घडली.
रुग्णालयात शस्त्रक्रिया साठी दाखल केल्यावर तातडीने रक्ताची गरज असते पण सध्या रुग्णालय व रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यातच आवश्यक ग्रुपचे रक्त न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे, अशा अनेक घटना दैनंदिन घडत असताना रुग्णांचा जीव वाचविण्याची मानसिकता असताना कधीकधी डॉक्टर देखील हतबल होत असतात.
14 जून जागतिक रक्तदाता दिवस , जागतिक रक्तदाता दिन हा जागतिक आरोग्य संघटनेने 2004 मध्ये सुरू केला, हा दिवस म्हणजे डॉ. कार्ल लँड स्टीनर यांचा वाढदिवस हा दिवस यासाठी साजरा केला जातो की जनमानसामध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण करणे तेही स्वयंस्फूर्तीने आणि पैसे, आमिष, भेटवस्तू न घेता आणि आरोग्यदायी माणसाकडून जेणेकरून रुग्णाला सुरक्षित रक्त व रक्तघटक मिळतील या वर्षीचे घोषवाक्य आहे….
“Doneting Blood Is an Act Of Soladarity, Join the efdorts & Save lives”
हा दिवस साजरा करण्याची कारणे अशी आहेत की सुरक्षित रक्त आणि रक्त घटक रुग्णालय मिळावेत लोकांमध्ये रक्तदानाविषयी जागरुकता व्हावी, जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करावी, रक्तदान शिबिरे घेऊन लोकांचा व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविणे व रक्तदानासाठी प्रोत्साहीत करावे.
रक्त ही एक अशी वस्तू आहे की जी कुठेही तयार होत नाही व तयार करता येत नाही म्हणजेच माणसाकडूनच ते दान करून घ्यावे लागते प्रत्येकाने रक्तदान हे कर्तव्य व देशसेवा म्हणुन करावे व दुसऱ्यालाही प्रोत्साहित करावे जेणेकरून देशात केव्हाचं रक्ताचा तुटवडा भासणार नाही.
शहरात रक्त तुटवड्याची काय आहेत कारणे?
पुणे शहरात नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे, अपघातामधील जखमींना तातडीने मोठ्या प्रमाणात रक्त द्यावे लागते, शहरातील रक्ताची मागणी वाढली पण त्या तुलनेत रक्तसंकलन झाले नाही.
रक्तपेढ्यांची का होते अडचण?
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, नेत्यांचे वाढदिवस असल्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या प्रचंड असते. आता शिबीर घेणे शक्य नाही असे संयोजकांना सांगण्याची वेळ येते पण ज्यावेळी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळी फोन करूनही शिबिर मिळत नाही, वैयक्तिक दात्यांना फोन केले की, काही पर्यटनाला गेले काहीना वेळ नाही. वर्षभर सातत्याने रक्तदान होणे आवश्यक असते एका दिवशी शंभरावर शिबिरे आणि महिन्याभरानंतर एकही शिबिर नाही ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.
रक्तदान शिबिरांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित रक्तपुरवठा होईल तुमच्या एका रक्तदानाने एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो ही जाणीव मनात कायम ठेवा प्रत्येकाने सणावाराचे, शुभ प्रसंग, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त, किंवा कोणत्याही प्रसंगी रक्तदान करावे, रक्तदान करण्याची वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे, वजन 45 किलो पेक्षा जास्त असावे, हिमोग्लोबिन प्रमाण 12.58 टक्के पेक्षा जास्त असावे, रक्तदान करताना पूर्णपणे निरोगी असावे, रक्तदानापूर्वी तुमचे मेडिकल करून, संमती घेऊनच रक्त घेतले जाते दोन रक्तदान मधील अंतर कमीत कमी पुरुषांमध्ये नव्वद दिवस व स्त्रियांमध्ये 120 दिवस असावे, सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान मध्ये सहभागी व्हावे.
डॉ.एस.के.राऊत
संचालक – नोबेल हॉस्पिटल
प्रमुख – ब्लड बँक नोबेल हॉस्पिटल