पुणे

शालेय फी लवकर भरा ,अन्यथा दाखला घेऊन जा, एन्जल शाळेचा पालकांना इशारा – प्रतिनीधी- स्वप्नील कदम.

लोणी काळभोर – कदमवाक वस्ती, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील लोणी काळभोर ( कदमवाक वस्ती) येथील एंजल हाई स्कूल मध्ये शालेय फी न भरल्यामुळे फी न भरलेल्या मुलांचीच एक वेगळी शाळा भरली गेली.
या मुलांना एक वेगळी वागणूक देण्यात आली. दिवसभर त्या वर्गामध्ये एकही शिक्षक फिरकले नाही. एखाद्या गुन्हेगारा सारखं त्यांना त्या वर्गात बसवून ठेवले.काय परिणाम झाले असतील, त्या कोवळ्या मनावर,
गेले दोन वर्ष कोरोनाने लोकांना हैराण केले. आता शाळा पालकांचा मागे हाथ धुन लागली आहे.फी भरा नाहीतर तुमच्या मुलांचे एडमिशन दुसऱ्या शाळेत करा ,असा दमच दिला जातोय शाळेकडून ,काय करायचे त्या मुलांच्या आई वडिलांनी , शालेय फी,ड्रेस ,पुस्तके , बुठ , ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च आता पालकांना न पेलवणारा आहे.आज कुठलीही शाळा पालकांचे म्हणणे ऐकून घेत नाही. फी भरा बाकी काही सांगू नका, त्यांच्याकडून एवढेच उत्तर येते,त्यात त्यांची जी भाषा असते ती भाषा शाळेतील शिक्षकांची नसून ती एखद्या वसूली वाल्याची असते, प्रिन्सिपलच्या ऑफिस बाहेर चार चार बॉडीगार्ड ठेवलेले असतात.
एंजल हाई स्कूल चे क्लार्क शेख यांची पालकांना बोलण्याची पद्धत फार चुकीची व आरेराविची असते. महिला पालकांना सुद्धा ते व्यवस्थित बोलत नाही.
हया सगळ्या घटनेची स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी त्या भागातील पत्रकार व पदाधिकाऱ्यांना बोलावून क्लार्क शेख यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . मुलांना व पालकांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर लवकरच शाळे समोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
हया वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे, पुणे जिल्हाध्यक्ष- सीताराम लांडगे, तालुकाध्यक्ष- पंढरीनाथ नामुगडे, विजय रणदिवे, ज्ञानेश्वर शिंदे , दिगंबर जोगदंड, रमेश निकाळजे , अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष- निलेश काळभोर, प्रहार संघटना हवेली तालुका उपाध्यक्ष – शिवराज मनोज काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य- भरत मिसाळ, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना पुणे- निलेश वाघमारे ,राष्ट्रवादी विद्यार्थी सेना उपाध्यक्ष- केतन साठे, गजानन काळभोर, युवा नेते अविनाश बडदे उपस्थित होते.