मुंबई

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तोडगा काढू….. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सोमवार दिनांक २०/०६/२०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकेतर महामंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या सभेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत राज्यामध्ये एकसारखेपणा असावा व ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली जात नाही त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १०,२०,३० वर्षाच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या वरच्या श्रेणी बाबत या विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. व याबाबत सभागृहांमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करीन असे बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले.याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा बाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. समीर सावंत सर यांना सूचना देण्यात आल्या. या सभेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे ओ. एस. डी. विजय बोरसे यांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाची राज्य सरकार्यवाह  शिवाजी खांडेकर यांनी दिली.