पुणे

कवठे येमाई येथुन आषाढी वारीसाठी दिंडीचे देहुकडे प्रस्थान कवठे येमाई (प्रतिनिधि धनंजय साळवे)

कवठे येमाई येथुन आषाढी वारीसाठी दिंडीचे देहुकडे प्रस्थान
कवठे येमाई (प्रतिनिधि धनंजय साळवे) 

आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त केलेली पायी पदयात्रा. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी आपल्या घराचा विचार न करता पायी निघतो.ज्ञानोबा तुकोबाचाचा गजर करत दरमजल करत पंढरपुरला जातो.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत पंढरपूरची वाट धरतो.ऊन वारा पाऊस या कशाची तमा न बाळगता फक्त विठ्ठल भेटीची आस धरतो.
पंढरीचा वारकरी !!!
वारी चुको न दे हरी !!!
ह्या तुकोंबाच्या उक्तीप्रमाणे वारकरी आपली वारी न चुकता करत असतो. तसा तो विठ्ठलला आळवणीच करत असतो.हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी मनोमन प्रार्थना करत पांडुरंगाच्या भेटीची आस धरतो.
कवठे येमाई येथील दिंडीने तुकाराम महाराजांच्या भव्य पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी ग्रामप्रदक्षिणा करत देवतांचे आशीर्वाद घेत देहुकडे प्रस्थान केले .यात अनेक वारकरी सामील झाले होते.त्यांना निरोप देण्यासाठी अनेक ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सामिल झाले मोठ्या आनंद उल्हासाने वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी वारीत सामील झाले होते.
कोरोनामुळं गेली दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आलं नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. दोन वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. या सर्वांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.