हडपसर,वार्ताहार. 21 जून हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करतात.योग व ध्यानधारणा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्राचीन काळापासून भारतात ॠषीमुनी यांनी अभ्यासपूर्वक योगासने व ध्यानधारणा याची निर्मिती केली.त्यामुळे भारतीयांचे आयुर्मान हे दीर्घायुषी होते. परंतु बदलत्या जीवनशैलीत आपण योगासने,व्यायाम व सकस आहार विसरत चाललो आहे.बाहेरील अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले अन्नपदार्थ खावेत. नियमित योगासने व व्यायाम करावा. कारण सकस आहार,योगासने व व्यायाम ही निरोगी जीवनाची गुरूकिल्ली आहे,असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,व साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व N.C.C महाराष्ट्र 2 बटालियन साधना विद्यालय TROUP नंबर 400 ,क्रीडाविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पतंजली योगसमिती हडपसरचे योग प्रशिक्षक सोमनाथ अडसूळे व अशोक अडसुळे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नियमित योगासने व व्यायाम करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमासाठी साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ,आजीव सभासद दत्तात्रय जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास २महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे चे कमांडिंग ऑफिसर कर्नल जे.एस.बाली. यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर,प्रल्हाद पवार, शिवाजी मोहिते ,एन.सी.सी ऑफिसर लालासाहेब खलाटे ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे ,ग्रंथालय प्रमुख प्रदीप बागल ,क्रीडाशिक्षक गणेश निचळे व सचिन धोदाड,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योगदिनाचे नियोजन एन.सी.सी. व क्रीडा विभाग यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी तर आभार रवींद्र भोसले यांनी मानले.