हवेली

कदम-वाकवस्ती येथील एंजल हायस्कूल मध्ये शाळेची फि न भरल्या मुळें विद्यार्थ्यांना एका वर्गात ठेवले डांबून

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

दोषीं शिक्षकांना कामावरून काढून टाकण्याचा पालकांचा शिक्षण केंद्रप्रमुख इंदलकर यांना इशारा

हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्ती : शिक्षण शुल्क न भरल्यामुळे विध्यार्थ्यांना एका वर्गात डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप कदम-वाकवस्ती येथील पालकांनी एंजल हायस्कूल विरोधात केला आहे, या संदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली पुणे. जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पदाधिकारी यांच्याकडे पालकांनी एंजल स्कुलच्या बाबतीत तक्रार केली होती, ह्या तक्रारीचा पाठपुरावा सोमवारी (दि.१९) रोजी शाळेत केला असता, तेथे मुलांबाबत अमानुष पद्धतीची वागणूक दिली जात आहे, असे समजल्यास पालकांनी एकत्र येऊन शाळां प्रशासनास, शिक्षण केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी इंदलकर यांना जाब विचारण्याचा प्रयन्त केला.

याविषयी बोलताना पालक रिबेका रॉबर्टसन म्हणाल्या की, शालेय शुल्क रकमेचा धनादेश मी शाळेकडे सुपूर्त केला असून देखील माझ्या मुलीला वेगळ्या वर्गात डांबून ठेवण्यात आले. यामुळे माझ्या मुलीच्या मानसिकता बिघडली असून ती शाळेत जाण्यास घाबरत आहे. तसेच या संदर्भात शाळेतील शिक्षक शेख यांना विचारणा केली असता ते महिलांशी व्यवस्थित तर नाहीच परंतू नेहमीच अंगावर धावून येत असतात आम्ही महिला असताना बऱ्याचदा आमच्याशी असेच गैरवर्तन करतात, ऐंजल शाळेतील तीन महिला शिक्षिका, व एक शिक्षक असे ह्या चौघांना ऐंजल स्कुल मधून कामावरून काढून टाकावे, नाहीतर आम्ही येत्या दोन दिवसात आंदोलन करू असा इशारा पालक वर्गाने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहोत असे पालक बोलत होते, व शाळेच्या अतिरिक्त शुल्क आकरणी संदर्भात देखील शिक्षणअधिकारी यांना तक्रार अर्ज केलेला असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले, परंतु शिक्षण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही, पालक कपिल काळभोर यांनी बोलताना सांगितले की शाळेच्या शालेय पालक समितीवर देखील त्यांच्याच मार्जितील पालक असल्याने वाढीव शुल्कविरोधात ते काही बोलत नाहीत.

खासगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शालेय शुल्क भरण्यासंबंधी तगादा लावल्याच्या घटना घडल्या आहेत, पालक निलेश काळभोर म्हणाले की, काही विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या घटना घडत आहेत, मात्र अशी पावलं उचलणं म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तर अशा शाळांवर कठोर कारवाई झाली पाहिजेत. या संदर्भात शिक्षण अधिकारी यांस संपर्क साधण्याचा प्रयन्त केला परंतु शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल आहेत, पालक संभ्रमात नेमकं कोणाला जाब विचारायचा असे पालकांचे म्हणणे समोर आले आहे.

शिक्षण अधिकारी व संबंधित प्रशासन या गंभीर घटनेच्या संदर्भात काय कारवाई करणार याकडे अन्याग्रस्त पालकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे, अध्यक्ष सीताराम लांडगे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पदाधिकारी व स्थानिक नागरिक व पालक उपस्थित होते.

काही पालकांनी गेली दोन ते तीन वर्षांची शालेय फि भरलेली नाही, त्यांना वेळोवेळी याविषयी विचारणा करून देखील फि जमा होत नाहीये, म्हणून विद्यार्थ्यांना वेगळ्या क्लास रूम मध्ये बसविले जात होते, व पालकांनी शाळेत येऊन चर्चा करून हा विषय मार्गी लावावा, याबाबत शाळा पूर्ण सहकार्य करेल, असे बोलताना शमशाद कोतवाल मुख्याधिपीका ऐंजल हायस्कूल, कदम-वाकवस्ती यांनी सांगितले आहे.

ऐंजल स्कुल मध्ये घडलेला प्रकार अतिशय वाईट असून त्यासंदर्भात शहानिशा करून व शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर घालून संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, व आता जी वर्तमान पालक समिती अस्तित्वात आहे ती बरखास्त करून दुसरी पालक समिती स्थापन करण्यात येईल व ऐंजल स्कुलच्या समितीवर बऱ्यापैकी पालक घेण्यात येतील व केंद्र प्रमुखांना त्यांच्या नावाची विचारणा केली असता, केंद्रप्रमुख इंदलकर यांनी त्यांचे नाव न सांगता विषय वाढवू नका व बातम्या निगेटिव्ह करू नका, मी वरिष्ठांशी बोलून हा विषय मार्गी लावत आहे, असे प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे.