पुणे

लहान मुलांसाठी नेत्ररोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न हडपसर मेडिकल असोसिएशन व आबणे हॉस्पिटलचा पुढाकार

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन)
हडपसर मेडिकल असोसिएशन आणि आबणे हॉस्पिटल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांचे नेत्ररोग तपासणी व उपचार हे शिबिर ८५ रूग्णांच्या तपासणी द्वारे पार पडले.
शिबिराचे उद्घाटन, डॉ. मंगेश वाघ ( मा. अध्यक्ष, हडपसर मेडिकल असोसिशन , मा. अध्यक्ष हांडेवाडी मंहमंदवाडी रोड डॉक्टर्स असोसिएशन ) यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये माफक दरात सर्व गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये १ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या प्रथम तपासणी वर ५०% सवलत देण्यात आली.
चष्म्यावर २०% सवलत आणि औषंधावर ५% सवलत तसेच इतर तपासणी वर ५०% सवलत देण्यात आली
शिबिर यशस्वी करण्यामागे डॉ. सचिन आबणे, डॉ. सुयोग काळभोर, डॉ. मंगेश बोराटे आणि इतर सर्व स्टाफ यांनी मोलाची मदत केली.
शिबिरामध्ये डॉ. वंदना आबणे यांनी मार्गदर्शन पर व्याखान दिले. हडपसर मेडिकल असोसिएशन आणि सर्व कार्य कारणी सदस्यांच्या मदतीमुळे गरजू पेशंटला या शिबिराचा लाभ घेता आला.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार देण्यात आला. शिबिरात ज्या लहान मुलांनी मोबाईलचा आणि स्कि्न याचा वेळ कमी केला त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यात आले. तसेच मुलांना मोबाइल पासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर ज्या रुग्णांनी आमच्या वैद्यकीय सेवेवर विश्वास दाखवून ऑपरेशन केले त्यांनाही सन्मानीत करण्यात आले.