पुणे

डिझेल चोरास लोणी काळभोर पोलिसांनी शिताफीने पकडून ठोकल्या बेड्या,

प्रतिनिधी स्वप्निल कदम
लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर न.२४४/२०२२भा. द. वि. कलम ३८१ मधिल फिर्यादी इसम नामे सचिन अशोक लडकत वय – ३७ वर्ष, व्यवसाय- ट्रान्सपोर्ट. रा.लडकतवाडी . ता. दौंड, जि. पुणे यांनी दि.७/५/२०२२ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार यांच्या मालकीचा ट्रक न. एम. एच.१२ एस. एफ/७७९७ मध्ये पुणे ते बेंगलूर असे भंगार वाहतूक तसेच सिमेंट वाहतूक करण्याकरिता त्यांनी त्यावर चालक म्हणून रवींद्र महादेव खामकर सध्या राहणार मु. पो.ओतूर ता. जुन्नर. जि. पुणे मुळ रा. मु.पो. देवळा, ता. अंबाजोगाई, जि.बीड पि. को.४३१५२३ यास दोन महिन्यापूर्वी विश्वासाने ठेवला होता. सदरील चालकाने ट्रक मालक यांचा विश्वास संपादन करून ट्रकचे डिझेल टाकीतील २०,०००/ रुपये किमतीचे अंदाजे २०० लिटर डिझेल हे कर्नाटक ते लोणी काळभोर,पुणे चे दरम्यान मालकाच्या परस्पर लवाडीच्या इरादांनी चोरी करून स्वतःच्या फायद्या करिता विकले म्हणून वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा तांत्रिक मदतीने शोध घेतला असता तो कर्नाटक, गुजरात , तामिळनाडू ,तसेच विदर्भ, मराठवाडा, या ठिकाणी जाऊन तो सतत ठिकाण बदलत असल्याने त्यास अटक करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. काल दि.३/७/२०२२ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास तो अहमदनगर येथे आल्याचे गोपनीय सूत्रांकडून तसेच तांत्रिक विश्लेषणातून माहिती मिळाल्याने लागलीस त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्याचा शोध घेऊन अटक करण्याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे ,पोलीस नाईक /४९३ संतोष राठोड ,पोलीस नाईक संभाजी देवीकर ,पोलीस अंमलदार शैलेश कुदळे ,अशी टीम तयार करण्यात आली त्यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना देऊन अहमदनगर या ठिकाणी रवाना केले.
त्याचप्रमाणे गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली की आरोपी हा अहमदनगर येथील सावेडी परिसरातील हॉटेल मातोश्री या ठिकाणी दारू पीत बसला आहे त्यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे तात्काळ सदर ठिकाणी पोचून तो त्या ठिकाणीच असल्याची आमची खात्री झाली त्यानंतर पो.नि. श्री राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टीमने हॉटेलच्या बाहेर सापळा रचून सदर आरोपीस सीताफिने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तसेच त्याने चोरी केलेले डिझेल हे वेळापूर महूद अकलूज भिगवन या ठिकाणी विकल्याचे आरोपीने सांगितले आहे .त्या सदर गुन्ह्यात अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याला दिनांक ६/७/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ह्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे. लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहे.