मुंबई : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा तारीख ठरली असून दि. 12 किंवा 13 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडी सरकार पाडले. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजप व शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असून दोन दिवसात खाते वाटपावर चर्चाही केली जाणार आहे.