पुणे

“चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रियेसीचा दगडाने ठेचून काढला काटा, “थेऊरच्या खुनाचा लोणी काळभोर पोलिसांकडून उलगडा”

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली तालुक्यातील : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हददीत दि.०५/०७/२०२२ रोजी चिंतामणी हायस्कुल समोरील मैदानाशेजारी, थेऊर ता-हवेली जि-पुणे येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्ष, रक्ताचे थारोळ्यात पडलेली आढळून आली होती.

घडलेल्या घटनेबाबत खात्री केली असता तिच्या डोक्यात दगड घालुन तिचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले.मात्र या महिलेस ओळखणारे कोणीही नसल्याने अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालुन खुन केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाणे भा.द.वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.दरम्यान मूर्त अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तसेच तिची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

त्याच प्रमाणे आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. नम्रतापाटील मॅडम, पोलीस उप-आयुक्त परि.०५. पुणे शहर, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसरविभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे वपोनि राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास सुचना देवून
आरोपीचे शोध घेणे बाबत आदेश दिला त्याप्रमाणेमात्र तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मृत महिलेचा शोध घेतला असता महिलेचे नाव वैशाली लाडप्पा दुधवाले, रा. भिमा कोरेगाव, शिरुर, पुणे व मुळगाव रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, उस्मानाबाद सध्या रा. असे असल्याचे निष्पन्न झाले.तिचे नातेवाईकाचा शोध घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता या महिलेचे एका व्यक्ती सोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीसांनी तपास सुरु केला. महिलेच्या प्रियकर महेश पंडित चौगुले, वय-२४ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव रा.चिवरी, उमरगा, तुळजापुर, उस्मानाबाद यास तळेगाव दाभाडे, पुणे परिसरातुन ताब्यात घेतले व त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यांचेकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने वैशाली लाडप्पा दुधवाले हिच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले वैशाली हिच्या चारित्र्याचा संशयावरुन तिला डोक्यात दगड मारुन खुन केला असल्याचे कबुली दिली.

संशयित आरोपीस दि.०९/०७/२०२२ रोजी रात्री ०१/०० वा अटक करण्यात आली असुन त्याला मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०६ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे करीत आहेत.सदर उल्लेखनिय कामगिरी अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, शहर, नम्रता पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५ल बजरंग देसाई, स. पो. आ. हडपसर विभाग, राजेन्द्र मोकाशी, वपोनि. सुभाष काळे पोनि (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा/नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे, पोना/ श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पो. शि/ गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.