प्रतिनीधी -स्वप्निल कदम
लोणी काळभोर – हवेली तालुका सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ११गुंट्याची खरेदीखत चालु आहेत. वास्तविक संपूर्ण राज्यामध्ये एकच कायदा असताना फक्त हवेली तालुक्यामध्ये वेगळा कायदा का? हवेलीतच खरेदी खते बंद का? असा सवाल जनतेतून होत आहे.
एखाद्या गरीब शेतकऱ्याला एक दोन गुंठे जागा विकून त्याच्या गरजा भागवू शकतो पण सरकारच्या तुकडा बंदी कायद्याच्या विळख्यात शेतकरी मात्र सापडला आहे.” इकडे आड तर तिकडे विहीर” अशी अवस्था शेतकऱ्याची होऊन बसली आहे.तरी शेतकऱ्याचा विचार करून सरकारने या कायद्यामध्ये बदल करून लवकरात लवकर हा कायदा उठवून शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये होत आहे.
एक दोन गुंठ्याचे खरेदी खत बंद करून सरकार शेतकऱ्याला आणखीनच अडचणीत आणत आहे. अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल निर्माण झाली आहे.