हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दितील कोळपे वस्ती येथे विलू पुनावाला फाउंडेशनच्या सहकार्याने कोळपे वस्ती येथे ‘वॉटर फिल्टर’ शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंक बसविण्यात आला आहे.
याचा लोकार्पण सोहळा कोळपे वस्ती या ठिकाणी आज संपन्न झाला. प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला सिरम कंपनीचे सीईओ. श्री. मल्हार करवंदे व आदर पुनावला क्लीन सिटी चे सर्व सन्माननीय अधिकारी यावेळी उपस्थित होते .
त्यांनी फिल्टर प्लांट बद्दल माहिती दिली .व वंचित असलेल्या वाड्या वस्त्यांवर अशाच प्रकारचा शुद्ध पाणीपुरवठा फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टाक्या फाउंडेशन मार्फत मोफत बसविण्यात येतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच पुनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून दररोज आपल्या गावातील स्वच्छ गाव करण्याकरिता त्यांच्यामार्फत कचरा उचलण्यासाठी गाड्या ही पूर्वीपासून चालू आहेत. या विलू पूनावाला फाउंडेशनचे व कंपनीचे गावाच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त केले
यावेळी स्थानिक नागरिकांना मोफत शुद्ध पाणी देण्यासाठी कार्ड वाटप करण्यात आले. या प्रकल्पाचे उद्घाटन लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संगीता काळभोर,मा. सरपंच राजाराम काळभोर,मा .उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर, वार्ड प्रतिनिधी विद्यमान ग्रामपंचायात सदस्य नागेश काळभोर,मा उपसरपंच ज्योती काळभोर,सदस्य सविता लांडगे,भारतीताई काळभोर,ललिता काळभोर. मा. उपसरपंच राजेंद्र काळभोर, सामाजिक कार्यकर्ते अमित काळभोर, नामदेव केसकर वार्ताहर बापूसाहेब काळभोर,सामाजिक कार्यकर्ते,बाबासाहेब करे,काळूबापू कोळपे तसेच स्थानिक ग्रामस्थ व तरुण सहकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.