पुणे

“माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये”

पुणे : पुरंदर तालुक्यातील माजी आमदार व माजी राज्यमंत्री नेते विजय शिवतारे यांचीही आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्यांचे शिवसेनेतील सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर आता बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू आहे. शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शिवताऱ्यांच्या हकालपट्टीची माहिती ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे.

विजय शिवतरे यांनी आज पुरंदर हवेलीतील शिवसेनेचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, गावोगावचे शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गणप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व इतर अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची बैठक पुरंदरेश्वरा या निवासस्थानी बोलवली होती.

विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई कऱण्यात आली आहे. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मातोश्रीवर बैठका घेण्याचा धडाकाच लावला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीत बसने शिवतारेंना भोवले
शिंदे गटाने बंडखोरी केल्यावर विजय शिवतारे यांनी जाहीर टीका करून राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, भाजपबरोबर शिवसेनेने जावे अशी जाहीर भूमिका घेतली होती, दिल्लीहुन पुणे विमानतळावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला माजी मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते, तसेच त्यांच्या गाडीत बसून हडपसर मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, उद्धव ठाकरे सध्या ऍक्शन मोडमध्ये असून त्यांनी हयगय न करता शिंदे गटास पाठिंबा देणाऱ्याची हकालपट्टी सुरु केली आहे त्यातच शिवतारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीत बसने वा समर्थन करणे चांगलेच भोवले दिसत आहे.