प्रतिनिधी -स्वप्नील कदम-
लोणी काळभोर -लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील सभ्य नागरिक तथा सर्वसामान्य रहिवाशामध्ये घातक शस्त बाळगून स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी दहशत पसरवणार्या दोन सराईतांस दोन वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
गणेश शिवाजी चौधरी रा.वायकरवस्ती कुंजीरवाडी,अजय श्याम विश्वकर्मा कॅनाॅलरोड,म्हातोबा आळंदी रस्ता कुंजीरवाडी अशी तडीपार करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिसरातील अभिलेखावरील गुन्हेगांरांचा शोध घेऊन त्यांच्याकडून समाजातील सर्वसामान्य नागरिकांवर होत असणार्या अत्याचार दहशत यावर लक्ष ठेवून त्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार गणेश चौधरी व अजय विश्वकर्मा हे टोळी तयार करुन पुणे सोलापूर महामार्गावर तसेच कुंजीरवाडी परिसरात घातक शस्रे बाळगून दहशत निर्माण करुन स्वतःचा अर्थिक फायदा करुन घेत असत यावर या दोघांविरुद्ध पोलीस निरीक्षक मोकाशी यांनी दोन वर्षाकरीता शहर व जिल्ह्यातून तडीपारीचा प्रस्ताव पुणे शहर परिमंडलच्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता यास या कार्यालयाकडून मंजूरी मिळाली आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका चौघुले पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप घनवटे यांनी केली.