लोणी काळभोर- लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजच्या कॉर्नर वर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मादक द्रव्य जाहिरात करून आशय फ्लेक्स लावून त्याची जाहिरात केल्याप्रकरणी देवीप्रसाद सुभाष शेट्टी (वय – ३३ वर्ष, रा.B /१००१/जय माला बिजनेस कोर्ट, शेवाळवाडी, ता- हवेली.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अँटी टेरेरीस सेल ( ए टी सी) चे पोलीस नाईक प्रदीप भीमराव शिरसागर यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२१ जुलै रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार लोणी काळभोर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये बेकायदेशीर आक्षेपार्ह जाहिरातीचे बॅनर फ्लेक्स लावले आहे काय याबाबत पेट्रोलिंग करून संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार अक्षय कटके व प्रदीप क्षीरसागर हे पेट्रोलिंग करत होते कदम वस्ती हद्दीत एमआयटी युनिव्हर्सिटी च्या कॉर्नर येथील,द टिप्सी टेल्स, नावाच्या हॉटेल समोर सोलापूर महामार्गाच्या लगत जाहिरातीचा फ्लेक्स लावला आहे. त्यावर एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘mit studant only, well come to talliland,on , 21St jully @ 799 unlimited ,drink for 2hours, असा आशय लिहिण्यात आला होता हॉटेल मालकाला फ्लेक्स लावण्या मागचे कारण विचारले असता त्याने सदरचा फ्लेक्स एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी लावलेला आहे. त्यामुळे माझा व्यवसाय वाढेल ह्या हेतूने फ्लेक्स लावलेला आहे असे हॉटेल मालकाने सांगितले त्यामुळे हॉटेल मालका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 74 महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 व जाहिरात नियंत्रण नियम 2003 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.