हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
सराईत गुन्हेगार सौरभ गोविंद इंगळे वय २२ वर्षे, रा. इराणी गल्ली, इराणी मशिद जवळ पठारे वस्ती, कदमवाकवस्ती ता.हवेली जि.पुणे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो लोणीकाळभोर पोलीस कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्हेगारास दिनांक २५/०८/२०२१ रोजी पासून २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केलेले असताना, तडीपार मा. पोलीस उप आयुक्त सो. परिमंडळ ५, पुणे शहर यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश करुन त्यांचे आदेशाचा भंग करीत लोणीकाळभोर पोलीस ठाणे हददीत बाजार मैदान येथे फिरत असलेबाबतची बातमी पोलीस अंमलदार राजेश दराडे यांना मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांना कळविले त्यांनी सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना कळविले असता त्यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अमित गोरे व अंमलदार यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या असता नपथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास लोणीकाळभोर गावचे हददीतुन बाजार मैदान येथे पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, संतोष होले, पोलीस राजेश दराडे आणि विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.