अवैधपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूच्या अड्याचा व १६,१००/ रु किमतीचा मुद्देमाल लोणी काळभोर पोलिसांनी केला नष्ट,
प्रतिनिधी स्वप्नील कदम
लोणी काळभोर -लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पोलीस उप-निरीक्षक घोडके यांना दिनांक २५ /७ /२०२२रोजी बातमी मिळाली की भवरापूर गावच्या हद्दीत ओढ्यालगत घेतलेल्या खड्ड्यामध्ये एक महिला बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी चालवत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद बातमीचा आशय पोलीस उप- निरीक्षक घोडके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी यांना माहिती दिली असता त्यांनी सोबत आवश्यक तो स्टाफ देऊन पुढील कारवाईबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे नमूद पथकाने दि २५ /७/ २०२२ रोजी १४/१५ वा. च्या सुमारास नमूद ठिकाणी छापा घातला असता एक महिला सदर ठिकाणावर जमिनीमधील खड्ड्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडी काठीने ढवळत असताना दिसली व पोलीस पथकास पाहून सदर ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली असता तिस म.पो. हवा होले यांनी पाठलाग करून पकडून तिला नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव व पत्ता लताबाई अरुण राजपूत, वय- ५० वर्ष रा.गोळीबार मैदान, भवरापूर, हवेली- पुणे असे सांगितले तेव्हा सदर ठिकाणी असणाऱ्या मालाची पाहणी केली असता नमूद ठिकाणी १)१०,५००/ रू किमतीचे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे एकूण ५२५ लीटर कच्चे रसायन २)५,६०० रू किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारु एकूण १४० लिटर असा एकुण १६,१०० रू. चा माल मिळून आला असून नमूद माला पैकी आवश्यक तेवढे सॅम्पल करता नमूना घेण्यात आले नंतर सदरचा माल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री नामदेव चव्हाण ,अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मा. नम्रता पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, मा.श्री.बजरंग देसाई सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुभाष काळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे), लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक घोडके, म. पो. हवा/ भारती होले, पो. ना.- अमित साळुंखे,पो. ना.- महाविर कुटे, पो. शि – निखील पवार, शैलेश कुदळे, योगेश पाटील, तुकाराम पांढरे, यांचा पथकाने केली आहे.