पुणे

व्यावसायिकाची ५ लाख रुपयांची फसवणूक करून सहा महिने फरार असलेला आरोपी अखेर गजाआड,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर-लोणी काळभोर हद्दीतील एका व्यवसायिकाला व्यवहारात सुमारे ५ लाख रुपयांचा अपहार करून गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
या प्रकरणी अश्रफ अमजद सय्यद वय -२९ वर्ष, रा. वाघेश्वरनगर,गोरे वस्ती वाघोली पुणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी निखील गुलाब कुंजीर वय २९ वर्ष रा. कुंजीरवाडी, पानमळा रोड ता. हवेली जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे होते. फिर्यादी निखिल यांनी हडपसर येथील पोपट भोलाजी ढवळे यांना ५ लाख रुपये देण्यासाठी आरोपी अश्रफ याच्या जवळ १ फेब्रुवारी २०२२ ला मोठ्या विश्वासाने दिले होते. परंतु आरोपीने सदर रक्कम पोपट ढवळे यांना न देता अपहार करून आरोपी अश्रफ हा फरार झाला. अश्रफ सय्यद फरार झाल्याचे कुंजीर यांच्या लक्षात येताच कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अश्रफ सय्यद याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकशी यांनी तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या पथकाला आरोपीस पकडण्यासाठी सूचना दिल्या.
गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस नाईक संभाजी देवीकर व बाजीराव वीर यांना आरोपी अश्रफ सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याची खबऱ्यामार्फत बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने ठीक ठिकाणी सापळा रचला परंतु आरोपीला सदर सापळ्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलिसांनी आरोपीला पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक संभाजी देविकर, अमित साळुंखे,पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर, शैलेश कुदळे, निखील पवार, यांच्या पथकाने केली आहे.