पुणे

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर टीमने  अंमली पदार्थांची विक्री करणा-या दोघांना केले जेरबंद

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करित असताना, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे येथे दोन इसम संशयित रित्या उभे असुन त्यांचेजवळ एम.डी नावाचे अंमली पदार्थ असुन ते विक्री करीत आहेत.

सदरबाबत बातमी मिळाल्याने श्री गणेश माने पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांनी स्वतः पोलीस पथकासह हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे येथे सापळा रचुन इसम नामे १) विराज इंद्रकांत छाडवा वय ३२ वर्ष रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळ जवळ, पांडवनगर, पुणे २) जयेश भारत कोटियाना वय २० वर्षे रा. तिरुपती लॉन्स, टिंगरेनगर, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २,१०,९५०/- रूपये किंमतीचे ६ ग्रॅम ९३० मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ दोन मोबाईल, स्वयंचलित बैटरी वरील वजन काटा मुद्देमाल जप्त करून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. ३४३ / २०२२ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१(क) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्हयामध्ये वर नमूद इसमांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, पोलीस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे व चालक पो ना. सुहास तांबेकर यांनी केली आहे.