श्रावण भाद्रपद महिन्याची चाहुल लागताच गणपतीबाप्पाच्या मुर्ती बनवायला वेग
कवठे येमाई( प्रतिनिधी धनंजय साळवे) – कवठे येमाई येथे गेली वीस वर्षांपासुन अर्धा फुटापासुन ते आठ फुटी ऊंच मुर्ती पर्यंत ए.व्ही.आर्ट गणपतीवाले चे विजय बगाटे हे मुर्ती बनविण्याचे काम करत आहे.विजय बगाटे हे रांजणगाव एम.आय.डी.सी.मध्ये एका नामांकीत कंपनीत काम करत आहे त्याचबरोबर त्यांना मातीच्या मुर्ती बनविण्याचा छंद लागला ह्या छंदाचे त्यांनी व्यवसायात रुपांतर केले .त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या गणपतीच्या मुर्ती विक्रीला असतात.यंदा राज्यशासनाने गणेश उत्सवाचे अनेक निर्बंध हटविले आहेत ऊंचीला मर्यादा ठेवली नाही तसेच कोरोनाच्या निर्बंधानंतर उत्साहात उत्सव साजरा होणार असल्यामुळें यंदा मुर्तींना जास्त मागणी असेल. गणेश उत्सवाला महिनाभरच वेळ असल्यामुळे मुर्तीकारांची मोठी लगबग पहायला मिळत आहे.बाल गणेश,शिवपार्वती बरोबरचा गणेश,दगडुशेठ गणपती,लालबागचा राजा,शारदासह गणपती, गणपती ,मयुरेश्वर ,सिंहासिनाधीन गणपती ह्या पारंपारीक मुर्तींबरोबर यंदा राममंदिर बरोबर असणारी गणपतीची मुर्ती आकर्षण असणार आहे .विजय बगाटे यांना त्यांच्या कामात त्यांचे कुटुंब ही मदत करत आहेत.यंदा कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे मुर्त्यांचे भावही वाढणार आहे.दोनशे रुपयांपासुन वीस हजारापर्यंत मुर्ती उपलब्ध असतात.घरगुती ग्राहकांबरोबरच गणेश मंडळांचे कार्यकर्तेही आताच आपणास हवी असणारी मुर्ती बनविण्यास सांगत आहे.