हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
आपल्या कामगिरीतून लोणी काळभोर परिसरात वेगळा दबदबा निर्माण करणारे पोलीस स्टेशन व लोणी काळभोर पंचक्रोशीत सामान्य जनतेशी नाळ जोडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांची बदली झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
२०१८ ते २०२२ या दरम्यानच्या कार्यकाळात पुणे ग्रामीण पोलीस असो वा पुणे शहर पोलीस अंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या महानोर
यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची आपल्याकडे असलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिक व चोखपणे पार पाडली. गंभीर व गुंतागुंतीचे
गुन्हे अतिशय कौशल्याने उघडकीस आणले. पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांनी अतिशयसमाधान पुर्वक सोडवल्याने त्यांची प्रतिमा अतिशय चांगली निर्माण झाली होती.
खून, दरोडा, बलात्कार, चोरी, गुंडगिरी या सारख्या गुन्ह्याची अतिशय चाणाक्ष व तांत्रिक विश्लेषणातुन उकल करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अनेक अडचणीचे व गुंतागुंतीचे गुन्हे त्यांनी सहज उलगाडले. त्यामध्ये लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकस्मात मयत झालेल्या व्यक्तीचा खुन झालेचे निष्पण झालेने त्याबाबत गुन्हा दाखल करून मयताची पत्नी व तीचा प्रियकर यांना शिताफीने सापळा रचुन अटक करुन केली. गारवा हॉटेलच्या मालकाचा खुन प्रकरणात सापळा रचुन आरोपींना अहमदनगर, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर जिल्हयात सलग ०७ दिवस तपास करुन वापरलेले हत्यार व वाहनासह ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचींग तसेच घर फोडीच्या गुन्हयातील आरोपी यांच्या कडे कौशल्याने तपास करुन त्यांच्याकडुन चैन स्नॅचींगचे ०२ तर घर फोडीचे ०८ असे एकुण १० गुन्हयाची महानोर यांनी केली उकल करून १३.८५,५५० (तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास) रुपयांचे सोन्याचे दागीने जप्त केले.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीतील डी. पी. चोरीच्या गुन्हयातील आरोपीबाबत गोपनीय माहीती प्राप्त करुन दोन आरोपीना अटक करुन त्यांचेकडुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथील एकुण ०४ डी. पी. चोरीच्या गुन्हयाची उकल करुन ८०,८००/- रु किं.च्या तांब्याच्या १०१ कि.ग्रॅम वजनाच्या तारा जप्त केल्या आहेत. अशा अनेक घटनांची उकल त्यांनी केली. लोणी काळभोर येथून निरोप देताना अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त करुन राजु महानोर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.