Uncategorizedपुणे

“संवाद वाढल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील कमी” “नावात काय आहे पुस्तक प्रकाशनात प्रा.सुभाष वारे यांचे मत”

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांशी संवाद कमी झाल्याने ते कर्जबाजारी झाल्यास चिंता वाढून आत्महत्या करतात, पण शेतकऱ्यांच्या बायका मात्र खंबीरपणे मुलांचा सांभाळ करतात, समाजात पती पत्नी संवाद वाढल्यास अनेक समस्या सुटतील असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत सेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुभाष वारे यांनी केले.
हडपसर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुधीर मैथेकर लिखित “नावात काय आहे” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा जेष्ठ लेखक व विचारवंत प्रा.सुभाष वारे यांच्या हस्ते व जेष्ठ कवी तथा लेखक प्रा.सूर्यकांत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ईशस्तवन मोहिनी उंडे यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधव उंडे यांनी तर स्वागत माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी केले. यावेळी लेखक सुधीर मेथेकर, डॉ. कृष्णा मेथेकर, रोहिणी मेथेकर व प्राजक्ता मेथेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, विजय देशमुख, योगेश ससाणे, रजनी पवार, सेवानिवृत्त प्राचार्य डी.एस.कुलकर्णी, उद्योजक विलास बाबर, अनुथम सोसायटीचे चेअरमन संतोष तुपे, सुजीत माने तसेच विविध संस्थाचे, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नावात काय आहे हे पुस्तक अतिशय अभ्यास करून लिहिले आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून नावांचा अर्थबोध होत असल्याने सुधीर मेथेकर यांच्या या वेगळ्या प्रयत्नाचे कौतुक आहे असेही प्रा.सुभाष वारे यांनी सांगितले.