नारायणगाव – स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान आयोजित महारक्तदान शिबिरात जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे रक्तदान करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. एकाचवेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४० ठिकाणी होत असलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यंदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना आदरांजली वाहण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहा लाखांचा विमा कवच उपलब्ध करून देत खासदार डॉ. कोल्हे यांनी रक्तदात्यांच्या विशेष काळजी घेतली असून असुरक्षित व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य नागरिकांना यानिमित्ताने प्रथमच विमाकवच मिळणार असल्याने या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
जुन्नर तालुक्यातील आपटाळे प्रा. आ. केंद्र, जुन्नर नगरपालिका शाळा, नारायणगाव मुक्ताई सामाजिक सभागृह / नविन हॉल, निमगाव सावा प्रा. आ. केंद्र, आळे प्रा. आ. केंद्र, डिंगोरे राममंदिर सामाजिक सभागृह, सावरगाव प्रा. आ. केंद्र तर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील रांजणगाव प्रा. आ. केंद्र, केंदूर प्रा. आ. केंद्र, टाकळी हाजी प्रा. आ. केंद्र, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील चांडोली ग्रामीण रुग्णालय, चाकण ग्रामीण रुग्णालय तसेच शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघातील उरळगाव (चंद्रभागा मंगल कार्यालय), तळेगाव ढमढेरे (गीताई विष्णू कार्यालय, चौफुला (मयुरी लॉंन्स), शिरूर शहर (नगरपरिषद हॉल), मांडवगण फराटा (पुण्याई कार्यालय), कोरेगाव मूळ / उरळी कांचन यशदा मंगल कार्यालय), वाघोली (ग्रामपंचायत कार्यालय) या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
https://fb.watch/eVIR1l3E35/
ग्रामीण भागाबरोबरच हडपसर, भोसरी या शहरी मतदारसंघातही रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद मिळाला असून भोसरीतील रुपीनगर (दक्षता गणपती मंदिर), चिखली (विकास साने कार्यालय), नेहरूनगर (अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, राजीव गांधी शाळेशेजारी), मोशी जय गणेश लॉन्स, इंद्रायणी नगर (संजय वाबळे संपर्क कार्यालय), दिघी गाव, दत्तनगर, मंगेश आसवले यांच्या घरासमोर, गणेश गार्डन राहुलनगर निगडी (श्रीराम भक्त हनुमान व्यायामशाळा), यमुना नगर निगडी, प्रबोधनकार ठाकरे स्केटिंग ग्राउंड, चक्रपाणी वसाहत (दुर्गामाता चौक पांडव नगर), लांडेवाडी चौक (राजमाता जिजाऊ महाविद्यालय), दिघी रोड (विरंगुळा केंद्र) या ठिकाणी आणि हडपसर येथील प्रभाग क्र.२२ केशवनगर – मांजरी (अजित घुले संपर्क कार्यालय, प्रभाग क्र.२३ साडेसतरा नळी – १५ नंबर आणि प्रभाग क्र. २४ साधना शाळा – माळवाडी (एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर), प्रभाग क्र. २५- सातववाडी गाडीतळ – (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन, गाडीतळ), प्रभाग क्र. ४७ कोंढवा- (सर्वे नं.५४, मारुती कॉम्प्लेक्स, बधेनगर, खडीमशीन चौक कोंढवा), प्रभाग क्र. ५७ सुखसागर नगर (अंबामाता चौक), प्रभाग क्र. ४१ व ४२ कोंढवा बु. सय्यद नगर, (कौसरबाग मस्जिद), प्रभाग क्र.४४ ससाणे नगर – काळेपडळ (सावली फौंडेशन, ससाणे नगर), प्रभाग क्र. ४६ महमंदवाडी- (दादा गुजर विद्यालय, तरवडेवस्ती), कात्रज गोकुळनगर – (विघ्नहर्ता कॉलनी, लेन नं.३, विठ्ठल रुक्मिणी मंदिर) अशा एकूण ४० ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.